श्रीनिवास नार्वेकर आमच्या कार्यशाळेत सहभागी शिबिरार्थींची जुजबी ओळख आणि प्रास्ताविक झाल्यानंतर साधारणपणे माझा पहिला प्रश्न असतो की आपल्या बोलण्यातला महत्त्वाचा घटक कोणता? एकेक उत्तरं येत जातात आणि अनेक घटकांबरोबरच ‘श्वास’ हा एक महत्त्वाचा घटक असल्याचं सर्वानुमते ठरतं. त्यानंतर मग – मराठीमध्ये ज्याला सर्वसाधारणपणे आपण ‘व्यायाम’ म्हणतो, असा एक एक्सरसाईज मी घेतो. तो एक्सरसाईज कोणता ? […]
श्रीनिवास नार्वेकर
आमच्या कार्यशाळेत सहभागी शिबिरार्थींची जुजबी ओळख आणि प्रास्ताविक झाल्यानंतर साधारणपणे माझा पहिला प्रश्न असतो की आपल्या बोलण्यातला महत्त्वाचा घटक कोणता? एकेक उत्तरं येत जातात आणि अनेक घटकांबरोबरच ‘श्वास’ हा एक महत्त्वाचा घटक असल्याचं सर्वानुमते ठरतं. त्यानंतर मग – मराठीमध्ये ज्याला सर्वसाधारणपणे आपण ‘व्यायाम’ म्हणतो, असा एक एक्सरसाईज मी घेतो. तो एक्सरसाईज कोणता ? तर अगदी साधा-सोपा. श्वास घेणं आणि सोडणं…
शीर्षक वाचून आश्चर्य तर नक्कीच वाटलं असेल ना तुम्हाला? श्वास तर आपण नेहमीच घेतो. श्वास घेतो, तो सोडतो – ज्या एकूणच प्रक्रियेला श्वासोच्छ्वास म्हणतात, हे आपण शाळेपासून शिकत आलेलो आहोत. ज्या प्रक्रियेवर आपलं एकूण जगणं अवलंबून आहे, ती प्रक्रिया म्हणजे श्वासोच्छ्वासाची प्रक्रिया!
मागल्या लेखापर्यंत आपण फक्त प्रत्यक्ष बोलण्यामागे म्हणजेच – आपल्या तोंडातून ध्वनी (Sound) द्वारे प्रत्यक्ष शब्द आवाज (Voice) म्हणून येण्यापूर्वी कोणकोणत्या गोष्टींचा नेमकेपणाने विचार करायला हवा, त्याबद्दल आपण भरपूर ऊहापोह केला. आता आपण प्रत्यक्ष बोलण्याकडे वळू. अर्थात अजूनही आपण तोंडातून शब्द म्हणजेच ध्वनीयुक्त (Sound) शब्द ज्याला आपण आवाज (Voice) म्हणतो तो आपण काढणार नाही. तर शब्द तोंडातून बाहेर पडण्यापूर्वी त्या शब्दामागचा, त्या बोलण्यामागचा विचार काय असायला हवा हे आपण पाहिलं. आता तो शब्द प्रत्यक्ष तोंडातून बाहेर पडताना तांत्रिकदृष्ट्या त्यावर कोणत्या गोष्टीचा परिणाम होतो हे आपण पाहणार आहोत.
या तांत्रिक गोष्टीमध्ये सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे श्वास. प्रत्यक्ष कार्यशाळेमध्ये मी याबद्दलचा प्रश्न विचारतो, तेव्हा काही क्षण, काही मिनिटं शांतता पसरते. कारण पुन्हा तेच-प्रत्यक्ष शब्द बोलण्यामागच्या गोष्टींचा (विचारांचा) आपण विचारच केलेला नसतो. तर आपल्या श्वासाकडे आपण किती लक्ष देतो? किंबहुना आपण आपल्या श्वासोच्छ्वासाच्या प्रक्रियेकडे लक्ष देतो का? दैनंदिन जगण्यात श्वासोच्छ्वासाला नेमकं किती आणि कसं महत्त्व आहे, त्याचा कधी आपण विचार केला आहे का? की ती एक सहज नैसर्गिक प्रक्रिया म्हणून त्याकडे दुर्लक्ष करत आलोय आपण? प्रामाणिकपणे सांगायचं, तर याच प्रश्नाचं उत्तर ‘हो’ हेच आहे.
95 टक्के लोकांनी याबद्दल गंभीरपणाने विचार कधीच केलेला नसेल, हे मी इतक्या वर्षांच्या अनुभवांती ठामपणाने सांगू शकतो. माझ्या या ठामपणाने सांगण्याला कारण आहे-माझा गेल्या अनेक वर्षांच्या कार्यशाळांचा, व्याख्यानांचा, शिबिरार्थींमध्ये प्रत्यक्ष जाणवलेल्या बाबींचा अनुभव. थोडक्यात, माझ्या आजवरच्या जवळ जवळ 30 ते 35 वर्षातल्या आवाज कार्यशाळेमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींच्या एकूण अभ्यासावरून काढलेला निष्कर्ष म्हणा ना!
आमच्या कार्यशाळेत सहभागी शिबिरार्थींची जुजबी ओळख आणि प्रास्ताविक झाल्यानंतर साधारणपणे माझा पहिला प्रश्न असतो की आपल्या बोलण्यातला महत्त्वाचा घटक कोणता? एकेक उत्तरं येत जातात आणि अनेक घटकांबरोबरच ‘श्वास’ हा एक महत्त्वाचा घटक असल्याचं सर्वानुमते ठरतं. त्यानंतर मग – मराठीमध्ये ज्याला सर्वसाधारणपणे आपण ‘व्यायाम’ म्हणतो, असा एक एक्सरसाईज मी घेतो. अगदी साधा. आपण नेहमी-अगदी आपल्या दैनंदिन जीवनात करत असतो तीच गोष्ट. पण इथे ती गोष्ट आपण करतो एक्सरसाईज म्हणून. रोजच्या जीवनात वापर करतानाही तो आपल्यासाठी फार महत्त्वाचा घटक आहे, याची कल्पनाच नसते आपल्याला. तो एक्सरसाईज कोणता? तर अगदी साधा-सोपा. श्वास घेणं आणि सोडणं…
शांतपणे श्वास घ्या.. सोडा… पुन्हा एकदा श्वास घ्या.. सोडा… आणखी एक-दोन वेळा हाच एक्सरसाईज करा. आता अगदी शांतपणे बसा दोन मिनिटं. आपण नक्की काय काय केलं, याचा विचार करा. वेगळं काय केलं? तर श्वास घेतला आणि सोडला, एवढंच! वेगळं काही केलं का? तर नाही. खरी गंमत तर त्यापुढेच आहे. हा श्वासोच्छ्वासाचा एक्सरसाईज झाल्यानंतर एक साधा प्रश्न माझ्याकडून विचारला जातो.
‘श्वास घेताना आणि सोडताना नेमकं काय होतं?’
या प्रश्नानंतर, नेमकं काय सांगावं, या विचारात 90 टक्के वेळा काही क्षणांची शांतता मी अनुभवली आहे. मग हळूहळू एकेक उत्तरं यायला लागतात. छान वाटतं, प्रसन्न वाटतं, मोकळं वाटतं. काही जणांच्या छातीवर काहीसा ताण येतो. काही जणांच्या पोटावर काहीसा ताण येतो. नेमकं काय होतं ते अनेकांना नेमकेपणाने सांगताच येत नाही. मग माझा त्या पुढचा प्रश्न असतो की श्वास घेताना आणि सोडताना पोटाची नेमकी हालचाल कशी होते? हा लेख वाचताना तुम्ही समोर नाहीत म्हणून अन्यथा हा प्रश्न विचारून मी पाच मिनिटे थांबलो असतो. पण तुम्ही आता खरोखरच थांबा काही क्षण इथेच. हा प्रश्न विचारल्यानंतर थेट पुढे न वाचता श्वासोच्छ्वासाचा एक्सरसाइज करा मी सांगतो त्याप्रमाणे. त्याचा नेमकेपणाने आणि गांभीर्याने विचार करा आणि त्यानंतर मग पुढे वाचायला सुरुवात करा.
ताठ बसा. अगदी शांत. अर्थात ताठ म्हणजे अगदी हात पाय घट्ट करून, आखडून घेऊन बसणं नव्हे. शरीराच्या कोणत्याही भागावर ताण येणार नाही, अशा पद्धतीने ताठ बसा. डोळ्यांवर, कपाळावर, हातावर, पायावर, पोटावर कसलाही ताण नकोे. अगदी मोकळं सोडून द्या शरीर. तरीही ताठ. जाऊ द्या काही क्षण असेच. नेहमी आपण घेतो, तसाच श्वास घ्या, सोडा. अगदी शांतपणे साधारण दोन मिनिटे ही श्वासोच्छ्वासाची प्रक्रिया चालू द्या, मग एका क्षणी मी सूचना देतोय, असं समजा आणि एक्सरसाईज सुरू करा. सूचना काय – तर साधारणपणे दोन मिनिटे दैनंदिन सवयीप्रमाणे अगदी शांतपणे श्वासोच्छ्वास केल्यानंतर ‘एक-दोन-तीन’ची सूचना द्या आणि अगदी पोटातून दीर्घ श्वास घ्या.
आता पोटातून दीर्घ श्वास घ्या, म्हणजे नक्की काय, हासुध्दा 90 टक्के जणांना पडलेला प्रश्न आहे. या एक्सरसाईजनंतर या प्रश्नाचं उत्तर सापडेल तुम्हाला स्वत:लाच. तर अगदी मनातल्या मनात ‘एक-दोन-तीन’ म्हणून दीर्घ श्वास घ्या आणि शांतपणे सोडा. श्वास घेताना आणि सोडताना, दोन्ही वेळा कोणतीही घाई नको. एरव्ही श्वास घेताना-सोडताना त्या कोणत्याही श्वासोच्छ्वासाचा मोठ्याने आवाज (Voice) होत नाही, याची तुम्हाला कल्पना असेलच. पण हा एक्सरसाईज करताना मात्र श्वास घेताना आणि सोडताना त्याचा ध्वनी (Sound) स्पष्टपणे यायला हवा आणि तो तुम्हाला जाणवायलाही हवा. का, ते बघू आपण पुढल्या वेळी…
आता… साधारण पाच आवर्तनं करा या श्वासोच्छ्वास प्रक्रियेची. मग थांबा. पुन्हा दोन मिनिटं अगदी नेहमीप्रमाणे नॉर्मल ब्रिदींग. रिलॅक्स व्हा. आता मी तुम्हाला प्रश्न विचारेन. श्वास घेताना आणि सोडताना पोटाची हालचाल नेमकी कशी झाली ? तुम्हाला काय जाणवलं ? अगदी विचारपूर्वक उत्तर द्या.
आधी हा एक्सरसाईज व्यवस्थितरित्या करून बघा. मग पुढल्या लेखापर्यंत उत्तराची वाट बघतोच आहे. त्यानंतर मग आपण पुढे सविस्तर बघू. मग कळेल साध्या श्वासाचंदेखील आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या आवाजाच्या सुधारणेमध्ये किती महत्त्व आहे!
बोलत असताना आपण आपल्या श्वासोच्छ्वास प्रक्रियेकडे अजिबातच लक्ष देत नाही, हे तर तुमच्या नक्कीच लक्षात येईल. आणि साहजिकच हे दुर्लक्ष आपल्या बोलण्याच्या पद्धतीवर कळत नकळत परिणाम करत जातं. याच परिणामांचा नेमकेपणाने विचार करण्यासाठी आता आपल्या या अध्यायापासून श्वासाबद्दलचा विचार सुरू करायचाय. करताय ना मग वर सांगितलेला एक्सरसाईज? भेटूच पुन्हा.
(लेखक आवाजसाधना व देहबोली विषयाचे प्रशिक्षक आहेत.)
| # | Наименование новости | Тональность | Информативность | Дата публикации |
|---|---|---|---|---|
| 1 | नाट्याचार्य विष्णुदास भावे | 0 | 13.43 | 08-08-2026 |
| 2 | You started working out and now you have cavities? Dentist explains how mouth breathing at gym harms your oral health | 0 | 5 | 01-07-2026 |
| 3 | भिंती नसलेले आकाश ! | 0 | 9.59 | 08-08-2026 |
| 4 | Друзья, прямо сейчас оторвитесь на минуту от экрана. У нас ... | 0 | 6.27 | 22-07-2026 |
| 5 | Человек думает словами. И чем беднее речь — тем беднее ... | 5 | 7 | 01-07-2026 |
| 6 | Человек думает словами. И чем беднее речь — тем беднее ... | -1 | 5.85 | 29-07-2026 |
| 7 | Человек думает словами. И чем беднее речь — тем беднее ... | -1 | 5.85 | 29-07-2026 |
| 8 | Hacer deporte, ¿lujo o necesidad? | 0 | 5 | 18-06-2026 |
| 9 | ⚔ Рубрика «Правда или миф» — В открытом космосе нельзя ... | 0 | 5.75 | 27-07-2026 |