नारायण गिरप कर्नाटकातील भागवत मंडळी कीर्तनी ‘खेळ’ करीत त्याप्रमाणे खेळ रचण्याची सांगली संस्थानाचे राजे चिंतामणराव पटवर्धन यांनी विष्णुदास भावेंना आज्ञा केली. भावेंनी कोकणातील पारंपरिक दशावतार आणि लोकनाट्याच्या तंत्राचा आधार घेऊन, त्यात सुधारणा करून 5 नोव्हेंबर 1843 साली राजांच्या पाठबळावर सांगलीच्या राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये ‘सीता स्वयंवर’ हे मराठीतील पहिले लिखित नाटक सादर करून मराठी रंगभूमीची मुहूर्तमेढ […]
नारायण गिरप
कर्नाटकातील भागवत मंडळी कीर्तनी ‘खेळ’ करीत त्याप्रमाणे खेळ रचण्याची सांगली संस्थानाचे राजे चिंतामणराव पटवर्धन यांनी विष्णुदास भावेंना आज्ञा केली. भावेंनी कोकणातील पारंपरिक दशावतार आणि लोकनाट्याच्या तंत्राचा आधार घेऊन, त्यात सुधारणा करून 5 नोव्हेंबर 1843 साली राजांच्या पाठबळावर सांगलीच्या राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये ‘सीता स्वयंवर’ हे मराठीतील पहिले लिखित नाटक सादर करून मराठी रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर रामायणातील कथानकांवर दहा नाटके लिहून त्याचे प्रयोग सांगली संस्थानात केले. तेही लोकप्रिय झाले.
महाराष्ट्र नाट्यकलेचे भरतमुनी, मराठी रंगभूमीचे जनक आणि आद्यनाटककार विष्णुदास भावे! विष्णुदास अमृतराव भावे यांचा जन्म 9 ऑगस्ट 1819 रोजी सांगली येथे झाला. शालेय वयातच शिक्षणापेक्षा कीर्तन, तमाशा, गाणी, गोष्टी, चित्रकला, हस्तकला, रेखाटन यात भावेंना विशेष रुची होती. विष्णुदास भावे हे अतिशय बुध्दिमान हस्तकला कारागीर होते. अगदी बारीकसारीक हालचाली करवून घेता येऊ शकतील अशा लाकडाच्या असंख्य बाहुल्या विष्णुदासांनी बनविल्या होत्या. कठपुतळ्या लाकडी असल्या तरी अतिशय हलक्या, रेखीव आकार, प्रमाणबध्द असून त्या चाकावर बसविलेल्या होत्या. त्या लोखंडी काठीच्या आधाराने आणि दोरीच्या साह्याने अशा दोन्ही प्रकारे खेळवता येत. रंगमंचावर ‘सीता स्वयंवर’ नाटकाचा प्रयोग बाहुल्या वापरून करावयाचा त्यांचा इरादा होता. पण कर्नाटकातील भागवत मंडळी कीर्तनी ‘खेळ’ करीत त्याप्रमाणे खेळ रचण्याची सांगली संस्थानाचे राजे चिंतामणराव पटवर्धन यांनी भावेंना आज्ञा केली. विष्णुदास भावेंनी कोकणातील पारंपरिक दशावतार आणि लोकनाट्याच्या तंत्राचा आधार घेऊन, त्यात सुधारणा करून 5 नोव्हेंबर 1843 साली राजांच्या पाठबळावर सांगलीच्या राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये ‘सीता स्वयंवर’ हे मराठीतील पहिले लिखित नाटक सादर करून मराठी रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर रामायणातील कथानकांवर दहा नाटके लिहून त्याचे प्रयोग सांगली संस्थानात केले. तेही लोकप्रिय झाले.
सूत्रधाराकडून मंगलाचरण, नंतर वनचरवेषधारी विदूषकाचा प्रवेश, त्याचे आणि सूत्रधाराचे विनोदी संभाषण, विघ्नहर्त्या गजाननाचे स्तवन, सरस्वती स्तवन, गजानन व सरस्वती यांचा आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर नाटकास प्रारंभ, अशी विष्णुदासांच्या नाट्यप्रयोगांची पद्धत होती. नाटकाच्या आरंभापासून अखेरपर्यंत सूत्रधारास काम असे. सादर होणार्या नाट्यप्रसंगांचे वर्णन सूत्रधाराने पद्यातून केल्यानंतर संबंधित पात्रे रंगभूमीवर येऊन आपापली भाषणे करीत. सर्वच भाषणे लिखित नसत. कलाकार स्वयंस्फूर्तीने तिथल्या तिथे प्रसंगोचित भाषणे करीत. नृत्य-गायनाला ह्या नाटकांतून बराच वाव दिला जाई. नाटकातील प्रवेशाला ‘कचेरी’ असे नाव दिलेले होते. भावे यांनी पुढे महाभारतातील कथानकांवरही नाटके लिहिली. विष्णुदास यांच्या नाटकांत पखवाजाची साथ प्रमुख असे. नाट्यप्रसंगाला अनुकूल असे कोमल, गंभीर वा तीव्र असे बोल पखवाजावर वाजविले जात असत. ह्या पखवाजाच्या आवाजावरून ह्या नाटकांना ‘तागडथोम नाटके’ असे म्हटले जाई. तसेच त्यातील राक्षसांच्या ‘अलल्डुर्र’ अशा डरकाळीमुळे ‘अलल् डुर्र’ नाटके असे त्यांना संबोधले जात असे.
भावेंच्या नाटकांवर कोकणातील दशावतार आणि कर्नाटकच्या यक्षगान (भागवत मेळा) या लोककलांचा मोठा प्रभाव होता. दशावतारासारख्या मुक्त व विखुरलेल्या लोककलेला एकात्मिक नि संघटित नाट्यमंडळींच्या स्वरुपात आणण्याचे श्रेय भावेंना जाते. भावेंनी पौराणिक आख्यानांवर नाटके बसविण्यासाठी पहिले नाट्यमंडळ स्थापन केले आणि दशावतारी खेळांच्याआधारे आधुनिक मराठी नाटकांचा पाया रचला. भावेंची ही पौराणिक नाटके बरीचशी पद्यमय होती. त्यातील पद्यरचनेचे प्राचीन मराठी आख्यानरचनेशी निकटचे नाते होते. त्यांच्या नाटकांसाठी त्यांनी विविध छंदात केलेल्या पद्यरचनांचा उल्लेख ‘नाट्याख्याने’ असाही करण्यात येतो. विष्णुदासी नाटकांचा मुख्य भाषारूप आधार म्हणजे ही पदेच होत. भावे यांनी एकूण 52 नाटके लिहिली. ह्या नाट्याख्यानांना स्वरसाज चढविताना विविध रागरागिण्यांचा आणि त्यांच्या मिश्रणांचा विष्णुदासांनी प्रभावीपणे उपयोग करून घेतला. विष्णुदासांच्या नंतरच्या 50-60 वर्षात मराठी पौराणिक नाटके लिहिणार्यांना विष्णुदासांनी निर्माण केलेला पौराणिक नाटकाचा साचा उपयोगी पडला. नाट्यप्रयोगाची एक निश्चित संकल्पना समोर ठेवून नाटक सादर करणारी पहिली नाटक मंडळी महाराष्ट्रात विष्णुदासांनी उभी केली.
विष्णुदास भावेंनी लेखन, दिग्दर्शन, गीतलेखन, निर्मिती करीत रंगभूमीवर व्यावसायिकता आणत अंगभूत गुण सिद्ध केले. 9 मार्च 1853 ला मुंबईत ग्रँट रोड थिएटर येथे ‘इंद्रजितवध’चा पहिला नाट्यप्रयोग केला. 1854 मध्ये ‘राजा गोपीचंद’ हे हिंदी नाटक लिहून दिग्दर्शित करून सादर केले. याद्वारे त्यांनी हिंदी रंगभूमीच्या विकासातही योगदान दिले. हिंदी रंगभूमीला जन्म देणारा मराठी नाटककार म्हणून धुरीणांनी त्यांना गौरविले होते.
विष्णुदास भावे स्मृतीप्रित्यर्थ सांगलीची अखिल भारतीय नाट्यविद्यामंदिर समिती 1960 पासून ‘विष्णुदास भावे’ पुरस्कार देत आली आहे. 5 नोव्हेंबर हा दिवस ‘मराठी रंगभूमी दिन’ म्हणून साजरा केला जातो. राज्य मराठी नाट्य परिषदेतर्फे याच दिवशी भावेंच्या नावे मानाचा पुरस्कार दिला जातो. विष्णुदासांनी 1861 पर्यंत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आपल्या नाटकांचे प्रयोग केले. राजे चिंतामणराव पटवर्धनांचे निधन झाल्यावर भावेंना सांगली संस्थानाकडून मदत मिळेनासी झाली. त्यामुळे त्यांना गावोगावी दौरे काढावे लागले. नाटककार, दिग्दर्शक, कपडेवाला, रंगवाला आदी सर्व काही भावे स्वतःच असत.
1843 च्या मुंबई दौर्यापासून या सांगलीकर मंडळींनी तिकिटे लावून प्रयोग सादर केले. लोकांना पैसे मोजून तिकिटे काढून नाटक पाहण्याची सवय लावली. 1862 च्या सुमारास भावेंनी नाट्यसंन्यास घेतला, पण त्यापूर्वी दरबाराचे कर्ज नि तसलमातीचा उलगडा करण्यास हा नाट्याचार्य विसरला नाही आणि 9 ऑगस्ट 1901 ला या नटवर्याने सांगली जन्मभूमीतून एक्झिट घेतली. मराठीतील पहिल्या संगीत नाटकाच्या दुनियेत झेंडा रोवून वेगळे स्थान निर्माण करणारा एक चतुरस्र अवलिया, जन्म-मृत्यूची तारीख-महिना एकच घेऊन पृथ्वीतलावर अवतरलेला हा हरहुन्नरी कलावंत अजरामर झाला. विष्णुदास भावेंचे कलागुण, अंगभूत गुणांवर प्राप्त केलेले ज्ञान, नवे प्रयोग, सुखदु:खाचे प्रसंग, त्यांनी केलेला संघर्ष या सगळ्या जीवनप्रवासाविषयी नवोदित नाट्य युवापिढीने जाणून घेणे आवश्यक आहे.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक आहेत.)
| # | Наименование новости | Тональность | Информативность | Дата публикации |
|---|---|---|---|---|
| 1 | ‘चला, आता श्वास घेऊ या!’ | 0 | 10.75 | 08-08-2026 |
| 2 | В день рождения МХТ им. А. П. Чехова зрителям представят пьесу "Царь Федор Иоаннович" | 0 | 0 | 26-10-2019 |
| 3 | Богомолов поставит в Театре на Малой Бронной "Покровские ворота" | 0 | 0 | 01-08-2019 |
| 4 | Театр на Малой Бронной поставил "Слово о полку Игореве" в исполнении хора охранников | 0 | 0 | 19-11-2019 |
| 5 | Петербург отметит Всемирный день театра творческими акциями и премьерами спектаклей | 0 | 0 | 26-03-2021 |
| 6 | В Театре имени Вахтангова впервые поставили пьесу Арбузова "Сказки старого Арбата" | 0 | 0 | 06-03-2021 |
| 7 | Новосибирский театр оперы и балета впервые представил оперетту "Летучая мышь" | 0 | 0 | 27-12-2018 |
| 8 | Московский театр Et Cetera представит премьеру классической комедии Скриба "Стакан воды" | 0 | 0 | 06-10-2021 |
| 9 | В Петербурге представят пьесу "Речь посланника" | 0 | 0 | 01-09-2025 |
| 10 | Театр Вахтангова первым представит новый спектакль по роману Юрия Слепухина | 0 | 0 | 07-11-2025 |