Вход на сайт

Просмотр новости

Найдите то, что Вас интересует

भिंती नसलेले आकाश !

Дата публикации: 08-08-2026 20:10:18

डॉ. शैलेंद्र गायकवाड आकाशाची सर्वात मोठी शिकवण म्हणजे विशालता. आपण अनेकदा स्वतःभोवती इतक्या भिंती उभ्या करतो की त्या भिंतीच आपले विश्व बनतात. मी एवढंच करू शकतो, माझ्या नशिबात हे नाही, माझ्याकडे साधने नाहीत, लोक काय म्हणतील? या विचारांच्या विटांनी आपण स्वतःच स्वतःभोवती तुरुंग उभा करतो. पण आकाशाकडे पाहिल्यावर लक्षात येते की निसर्गाने कुठेच भिंती बांधलेल्या […]

Основное содержимое страницы с новостью.

डॉ. शैलेंद्र गायकवाड

आकाशाची सर्वात मोठी शिकवण म्हणजे विशालता. आपण अनेकदा स्वतःभोवती इतक्या भिंती उभ्या करतो की त्या भिंतीच आपले विश्व बनतात. मी एवढंच करू शकतो, माझ्या नशिबात हे नाही, माझ्याकडे साधने नाहीत, लोक काय म्हणतील? या विचारांच्या विटांनी आपण स्वतःच स्वतःभोवती तुरुंग उभा करतो. पण आकाशाकडे पाहिल्यावर लक्षात येते की निसर्गाने कुठेच भिंती बांधलेल्या नाहीत.


मला अजून आकाशाकडे बघणं सोडवत नाही- कारण आकाश मला माझ्या मर्यादा नव्हे, तर माझ्या शक्यता दाखवते. आजकाल मी अनेकदा एक गोष्ट अनुभवतो. रस्त्यावर चालणारे लोक दिसतात; पण त्यांची नजर वर नसते. ती मोबाईलच्या पडद्यावर असते. बसस्थानकावर थांबलेले लोक, रेल्वेत बसलेले प्रवासी, उद्यानात फिरणारे नागरिक, अगदी घरात एकत्र बसलेले कुटुंबीयसुद्धा-सर्वांचे डोळे एखाद्या स्क्रीनवर खिळलेले असतात. माहितीचा महापूर वाहतो आहे; पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे माणसाच्या मनातील विशालता मात्र कमी होत चालली आहे. अशा वेळी मला स्वतःला एक प्रश्न पडतो-आपण शेवटचे आकाशाकडे कधी पाहिले होते? मी मात्र अजूनही आकाशाकडे पाहतो. आणि खरं सांगायचं तर मला अजून आकाशाकडे बघणं सोडवत नाही. कारण आकाश माझ्यासाठी निसर्गाचा एक भाग नाही; ते माझा शिक्षक आहे. ते माझे आरसे आहेत. ते माझ्या विचारांची प्रयोगशाळा आहे. जेव्हा मी आकाशाकडे पाहतो, तेव्हा मला माझ्या समस्या दिसत नाहीत; मला माझ्या शक्यता दिसतात.

आकाशाची सर्वात मोठी शिकवण म्हणजे विशालता. आपण अनेकदा स्वतःभोवती इतक्या भिंती उभ्या करतो की त्या भिंतीच आपले विश्व बनतात. मी एवढंच करू शकतो, माझ्या नशिबात हे नाही, माझ्याकडे साधने नाहीत, लोक काय म्हणतील? या विचारांच्या विटांनी आपण स्वतःच स्वतःभोवती तुरुंग उभा करतो. पण आकाशाकडे पाहिल्यावर लक्षात येते की निसर्गाने कुठेच भिंती बांधलेल्या नाहीत. भिंती आपण बांधतो; विस्तार निसर्ग देतो. मानसशास्त्रात एक महत्त्वाचा सिद्धांत आहे-ज्या गोष्टीवर आपण वारंवार लक्ष केंद्रित करतो, त्याच दिशेने आपले मन घडत जाते. जर आपण सतत समस्या पाहिल्या, तर मन समस्याकेंद्रित होते. जर आपण सतत भीती पाहिली, तर मन भयग्रस्त होते. पण जर आपण विशालतेकडे पाहिले, तर मनही विशाल विचार करू लागते. म्हणूनच आकाशाकडे पाहणे ही फक्त सवय नाही; ती मनाच्या विस्ताराची प्रक्रिया आहे.

लहान मुलांकडे पाहा. ते ढगांत आकार शोधतात. पक्ष्यांच्या उडण्यात आनंद शोधतात. चंद्राशी बोलतात. तारांकडे पाहून प्रश्न विचारतात. ही जिज्ञासा त्यांच्या बुद्धीचा पाया असते. पण जसजसे ते मोठे होतात, तसतसे आपण त्यांना सांगू लागतो-व्यवहार बघ, स्वप्नं कमी पाहा, जास्त विचार करू नकोस. आणि नकळत त्यांच्या मनाचे आकाश लहान करत जातो. मोठी स्वप्ने पाहणारा प्रत्येक माणूस सुरुवातीला अवास्तव वाटतो. पण इतिहासातील प्रत्येक मोठा बदल अशाच एखाद्या अवास्तव वाटणार्‍या कल्पनेतून सुरू झाला आहे. जर माणसाने आकाशाकडे पाहिले नसते, तर कदाचित विमानाचा शोध लागला नसता. जर त्याने तारांकडे पाहून प्रश्न विचारले नसते, तर अंतराळ संशोधन झाले नसते. जर त्याने क्षितिजापलीकडे जाण्याचे धाडस केले नसते, तर जगाचा नकाशाच वेगळा असता.

आकाश मला आणखी एक गोष्ट शिकवते-संयम. आज आपण तात्काळ परिणामांच्या युगात जगतो. दोन मिनिटांत अन्न, काही सेकंदांत माहिती, एका क्लिकवर खरेदी, काही क्षणांत मनोरंजन. त्यामुळे जीवनातील प्रत्येक गोष्ट तितक्याच वेगाने मिळावी, अशी अपेक्षा निर्माण झाली आहे. पण निसर्गाचा वेग वेगळा आहे. सूर्योदयाला घाई नसते. बीजाला झाड व्हायला वेळ लागतो. गर्भाला जन्मासाठी नऊ महिने लागतात. नदीला समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी हजारो वळणे घ्यावी लागतात.

मग माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला, चारित्र्याला आणि यशाला वेळ का लागणार नाही? आकाशाकडे पाहताना मला हे वारंवार जाणवते की मोठेपणा वेगाने नाही, तर सातत्याने घडतो. आकाश नम्रताही शिकवते. आपण आपल्या छोट्या यशामुळे कधी कधी गर्विष्ठ होतो. पण एका रात्री तारकांनी भरलेल्या आकाशाखाली उभे राहिलो की जाणवते-या विश्वात आपले अस्तित्व किती सूक्ष्म आहे! ही जाणीव माणसाला कमी लेखत नाही; उलट त्याला अधिक जबाबदार बनवते. कारण इतक्या विशाल विश्वात जन्म मिळणे हीच एक विलक्षण संधी आहे. आज मानसिक ताण, नैराश्य, चिंता आणि एकाकीपणा वाढताना दिसतो. त्यामागे अनेक कारणे आहेत; पण त्यातील एक कारण म्हणजे दृष्टीचा संकोच. आपण इतके स्वतःभोवती फिरू लागलो आहोत की व्यापक चित्र पाहण्याची सवय हरवली आहे. प्रत्येक छोटा अडथळा आपल्याला पर्वत वाटतो, कारण आपण क्षितिज पाहत नाही.

मी अनेक समुपदेशन सत्रांमध्ये एक गोष्ट अनुभवली आहे. जे लोक आपल्या दुःखालाच संपूर्ण जीवन मानतात, त्यांना व्यापक दृष्टिकोन मिळाला की त्यांच्या मनात आशेची जागा निर्माण होते. परिस्थिती बदलण्यापूर्वी दृष्टी बदलते; आणि दृष्टी बदलली की कृती बदलते. आकाशाकडे पाहणे म्हणजे वास्तवापासून पळून जाणे नव्हे. उलट वास्तव अधिक स्पष्टपणे पाहण्याची तयारी आहे. कारण वर पाहणारा माणूस खालील जमिनीचेही महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे समजतो. गरुड जितका उंच उडतो, तितक्याच अचूकतेने तो जमिनीवर लक्ष ठेवतो. उंची आणि वास्तव यांचा समतोल साधणे हीच खरी प्रगल्भता आहे.

मला अनेकदा विचारले जाते, मोठी स्वप्ने पाहण्यात अर्थ काय? सर्वांची स्वप्ने पूर्ण होतात का? माझे उत्तर असते-स्वप्न पूर्ण होईल की नाही, हे नंतर ठरते; पण मोठे स्वप्न माणसाला मोठे नक्कीच बनवते. ध्येय गाठण्यापूर्वी ध्येय आपल्याला घडवत असते. म्हणूनच मला अजून आकाशाकडे बघणं सोडवत नाही. कारण मला अजूनही विश्वास आहे की प्रत्येक माणसात एक सुप्त विश्व आहे. प्रत्येक बालकात एक संशोधक, एक कलाकार, एक विचारवंत, एक समाजनिर्माता दडलेला आहे. प्रत्येक कुटुंबात संस्कारांचे आकाश विस्तारू शकते. प्रत्येक समाज स्वतःच्या मर्यादा ओलांडू शकतो. आज आपल्याला फक्त तंत्रज्ञानाने प्रगत समाज नको आहे; आपल्याला विशाल मनाचा समाज हवा आहे. कारण उंच इमारती बांधणे सोपे आहे, पण उंच विचार घडवणे कठीण आहे. वेगवान इंटरनेट मिळवणे सोपे आहे, पण व्यापक दृष्टी मिळवण्यासाठी अंतर्मुख व्हावे लागते.

जेव्हा जेव्हा मी आकाशाकडे पाहतो, तेव्हा मला माझ्या स्वप्नांची आठवण येते; पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे माझ्या जबाबदार्‍यांची आठवण होते. त्या निळ्या विशालतेतून एक शांत संदेश ऐकू येतो- तू किती उंच गेलास, यापेक्षा तुझ्या उंचीमुळे किती जणांना दिशा मिळाली, हे अधिक महत्त्वाचे आहे. यश म्हणजे फक्त शिखर गाठणे नाही; यश म्हणजे इतरांसाठी क्षितिज विस्तारणे. शिक्षण म्हणजे पदवी नाही; ती दृष्टी आहे. संपत्ती म्हणजे पैसा नाही; ती मनाची समृद्धी आहे. आणि जीवन म्हणजे फक्त जगणे नाही; तर स्वतःमध्ये अशी विशालता निर्माण करणे की आपल्या अस्तित्वामुळे इतरांच्याही आकाशाचा विस्तार व्हावा. म्हणून आजही मी काही क्षण थांबतो. मोबाईल बाजूला ठेवतो. मान वर करतो. त्या निळ्याशार आकाशाकडे पाहतो. आणि स्वतःलाच हळूच सांगतो-जोपर्यंत माझ्या डोळ्यांत आकाश आहे, तोपर्यंत माझ्या मनात आशा आहे. जोपर्यंत मनात आशा आहे, तोपर्यंत प्रयत्न जिवंत आहेत. आणि जोपर्यंत प्रयत्न जिवंत आहेत, तोपर्यंत परिवर्तन शक्य आहे. म्हणूनच मला अजून आकाशाकडे बघणं सोडवत नाही.

Схожие новости

#Наименование новостиТональностьИнформативностьДата публикации
1मजबुतीचे रहस्य योग्य रचनेत!08.3308-08-2026
2Вселенная дает человеку контекст. Она определяет физические рамки нашего бытия, ...05.5507-08-2026
3Я каждый раз уношу с собой это чувство когда вижу ...10306-07-2026
4‘चला, आता श्वास घेऊ या!’010.7508-08-2026
5Четыре стены. Сдержанная палитра. И бесконечный внутренний космос. Мы почти ...5628-06-2026
6"Our real self is the whole cosmos. We've forgotten that. ...0530-07-2026
7Есть вещи, которые не зависят от даты в календаре. Космос ...07.610-08-2026
8Доктор наук Николаев: чтобы спасти мир от самоуничтожения, надо осваивать ...0516-07-2026
9Просветленые это не оно не гурджиев не лао цзы не ...05.1210-08-2026
10🌌 Естественнонаучная направленность. «Астрономия»: открой тайны Вселенной — стань исследователем звёзд! 🌌Мечтает ...05.9910-08-2026

Классификация: . Схожих патентов: 0. Схожих новостей: 10. Тональность: 0. Информативность: 9.59. Источник: www.mymahanagar.com.