संजीव साबडे आधीच्या पिढ्यांना जेन झी म्हणजे बिघडलेली पिढी असं वाटतं. देशातील असंख्य राजकारणीही तसाच विचार करतात. त्यांना वाया गेलेली, शिव्या देणारी, कसेही वा फाटके कपडे घालणारी, रात्री अपरात्री घरी येणारी, उशिरा उठणारी, वेळी अवेळी काही तरी भलतं खाणारी, सतत बाहेरून खाद्यपदार्थ मागवणारी म्हटलं जातं. बिनधास्त एकमेकांना हग करणारी, गालावर सहजपणे किस करणारी, हातात हात […]
संजीव साबडे
आधीच्या पिढ्यांना जेन झी म्हणजे बिघडलेली पिढी असं वाटतं. देशातील असंख्य राजकारणीही तसाच विचार करतात. त्यांना वाया गेलेली, शिव्या देणारी, कसेही वा फाटके कपडे घालणारी, रात्री अपरात्री घरी येणारी, उशिरा उठणारी, वेळी अवेळी काही तरी भलतं खाणारी, सतत बाहेरून खाद्यपदार्थ मागवणारी म्हटलं जातं. बिनधास्त एकमेकांना हग करणारी, गालावर सहजपणे किस करणारी, हातात हात घालून मोकळेपणाने फिरणारी मुलं-मुली पाहून ‘हमारे जमाने में’वाल्या पिढीला खूप मानसिक त्रास होतो.
‘जेन झी’ हा शब्दप्रयोग सतत व सर्वत्र ऐकण्यात-वाचण्यात येत आहे. कॉक्रोच आंदोलनाआधी जेन झी या शब्दाचा वापर फारसा होत नव्हता. आंदोलन सुरू झाल्यानंतरही जेन झी म्हणजे नेमकं काय हे कळत नव्हतं. जेन म्हणजे जनरेशन व झेड किंवा झी हे दोन्ही शब्द इंग्रजी आणि आपल्या नेहमीच्या वापरात नसलेले म्हणजेच अपरिचित. त्यामुळे मराठीत सर्वत्र विद्यार्थी आंदोलन, तरुणांचं आंदोलन आणि पेपरफुटीच्या विरोधातील आंदोलन असंच लिहिलं-म्हटलं गेलं. आंदोलन पेपरफुटीच्या विरोधात असलं तरी सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी तरुणांच्या पिढीला झुरळ संबोधल्यामुळे हे युवक व विद्यार्थी त्याच नावाने देशभरातील रस्त्यांवर उतरले आणि त्यांनी झुरळं किती ताकदवान वा उपद्रवी असू शकतात, हे दाखवून दिलं. ही पिढी आई-वडिलांच्या पैशांची उधळपट्टी करणारी, न ऐकणारी, ऐश करणारी व व्यसनाधीन आहे, असे जे आरोप होत आहेत ते कितपत खरे वा खोटे, हे तपासायला हवं. अख्खी एक पिढी अशी कशी असू शकेल? एरवी राजकारण वा राजकारणी यांच्याशी फटकून वागणार्या जेन झीच्या मनात काय सुरू होतं वा असतं, हेही समजून घ्यायला काय हरकत आहे?
जेन झी म्हणजे 1997 ते 2012 या काळात जन्मलेले 14 ते 29 या वयोगटातील सर्व. म्हणजे शाळा, कॉलेजांत शिकणारे, विशेष उच्च शिक्षण घेऊ इच्छिणारे आणि शिक्षण पूर्ण होऊनही चांगली मनाजोगती वा कोणतीच नोकरी न मिळालेले. ही पिढी स्मार्टफोन, इंटरनेटच्या जमान्यात जन्मलेली वा वाढलेली आहे, ती स्वत:च्या करिअरला वळण देऊ पाहत आहे, त्यासाठी स्वत:शी व बाहेरच्या परिस्थितीशी झगडत आहे. सोशल मीडियाच्या प्रभावामुळे माहितीचा खच डोक्यात पडून लवकर निराश होत आहे, सतत तणावाखाली जगत आहे. जे पटत नाही, ते पटकन बोलून ही पिढी मोकळी होते वा ज्यांच्याशी पटत नाही वा जे दबाव आणत राहतात, त्यांच्यापासून दूर राहत आहे. यात त्यांचे आई-वडील व इतर नातेवाईकही आहेत. रात्री उशिरापर्यंत सोशल मीडियावर सक्रिय राहणारी, उशिरा उठल्यावर घरात फार वेळ बसून न राहता काही खाऊन लगेच बाहेर पडणारी आहे ही पिढी. ही मुलं आमच्याशी बोलत नाहीत, अशी आई-बापाची तक्रार असते.
घरात वाद होऊ नये, म्हणून शक्यतो गप्प बसणारी आहे ही पिढी. याआधीच्या पिढ्या वाद घालायच्या, तेव्हा मुलं उलट बोलतात, अशी तक्रार असायची. आता चित्र उलट आणि तरीही तक्रार कायम. त्यांची आपापसातील भाषा वेगळी, शब्दप्रयोग आणि खाणाखुणाही वेगळ्या. त्यांच्या मराठीत इंग्रजी व हिंदी असतं आणि हिंदीत मराठी डोकावतं. उदाहरण द्यायचं झालं तर ‘I will collect him from the airport’ असं मराठीत सांगण्यासाठी ‘मी त्याला एअरपोर्टवरून उचलेन’, असं त्यांचं वाक्य असतं. ते आपसात बोलतात, तेव्हा वापरत असलेले काही मराठी, इंग्रजी वा हिंदी शब्द शब्दकोशामध्ये सापडत नाहीत. डुलूलू, ब्रुह, पॉग, बुसीन, फ्लेक्सिन, न्यूब, हायकी, वाइब हे शब्द कानावरून गेले नसल्याने त्यांचं बोलणं आपल्याला बर्याचदा कळत नाही. आपल्यापैकी अनेकजण त्यांच्यापेक्षा पूर्णपणे वेगळ्या वातावरणात, परिस्थितीत, वेगळ्या शिक्षणव्यवस्थेत, वेगळ्या संस्कारात आणि वेगळ्या भाषेत वाढलो आहोत.
आपल्यातील अनेकांचं स्वप्न आर्ट्स, सायन्स, कॉमर्सची पदवी मिळवून सरकारी वा बँकेची नोकरी मिळवणं हेच होतं. एकदा चिकटलो की निवृत्तीनंतरच सुटणार अशी नोकरी मिळावी, असं आपल्याला व पालकांना वाटायचं. शिक्षणाच्या व नोकरीच्या संधी आणि अभ्यासक्रम हेही इतके नसायचे. संगीत, डान्स, कराटे, ज्युडो यात करिअर करणं हा विचार पालकांच्या तर सोडाच, आपल्याही मनात तेव्हा डोकावला नव्हता. त्यामुळे आधीच्या पिढ्यांना जेन झी म्हणजे बिघडलेली पिढी असं वाटतं. देशातील असंख्य राजकारणीही तसाच विचार करतात. त्यांना वाया गेलेली, शिव्या देणारी, कसेही वा फाटके कपडे घालणारी, रात्री अपरात्री घरी येणारी, उशिरा उठणारी, वेळी अवेळी काही तरी भलतं खाणारी, सतत बाहेरून खाद्यपदार्थ मागवणारी म्हटलं जातं. बिनधास्त एकमेकांना हग करणारी, गालावर सहजपणे किस करणारी, हातात हात घालून मोकळेपणाने फिरणारी मुलं-मुली पाहून ‘हमारे जमाने में’वाल्या पिढीला खूप मानसिक त्रास होतो. स्त्री व पुरुष यांच्यात फक्त शारीरिक व लैंगिक संबंधच असू शकतात आणि त्यांचं असं जवळ असणं म्हणजे हे एकमेकांसोबत झोपत असणार, असं आपल्याला वाटतं. आपल्यालाच काय, कंगना राणावतसारखी खासदार असलेली अभिनेत्रीही ‘जेन झी’कडे त्याच पद्धतीने पाहते.
त्यात आश्चर्य वाटण्याचं वा धक्कादायक असं काहीच नाही. सर्व पिढ्यात असं घडतं. आधीच्या पिढ्यांतील मंडळींनी स्वातंत्र्य, आणीबाणी, जयप्रकाश आंदोलन, नेहरू, शास्त्री, इंदिरा व राजीव गांधी, नरसिंह राव, वाजपेयी, मनमोहन सिंग यांची सरकारं, दुष्काळ, रेशनिंग, टंचाई यापैकी काही ना काही पाहिलेलं. जेन झीला हे माहीत नाही. काहींना वाजपेयी व मनमोहन सिंग ऐकूनच माहीत आहेत. शिवाय होऊन गेलेल्या इतिहासात अडकून पडण्यापेक्षा ते भविष्याकडे पाहत आहेत. तिथं त्यांना समस्याच समस्या दिसत आहेत. आधीच्यांनाही त्या होत्या, पण स्पर्धेच्या युगात त्या अधिक बिकट झाल्या आहेत.
शिक्षणासाठी पैसा नाही, कर्ज काढावं लागतंय, प्रत्येक ठिकाणी स्वत:ला सिद्ध करावं लागतंय, उत्तम गुणाने उत्तीर्ण होऊनही चांगली वा हवी तशी नोकरी मिळण्याची खात्री दिसत नाहीए. ही मुलं पटापट नोकर्या बदलत आहेत, शिक्षण व रोजगारासाठी परदेशी धावू पाहत आहेत, त्याची ही कारणं आहेत. आपल्या आजूबाजूला या वयातील अनेक गरीब मुलं-मुली झोमॅटो, स्विगी, डेंझो, स्नॅबइट, प्रॉनटो, अर्बन कंपनी वा तत्सम ठिकाणी डिलीव्हरी बॉय-गर्ल, घरकाम वा अन्य छोट्या पगाराच्या नोकर्या करताना दिसत आहे. ना पीएफ, ना पेन्शन, ना कसली शाश्वती. त्यांच्या मनातली घुसमट आपल्याला समजतच नाही. तशीच घुसमट व चीड दिल्लीतील कॉक्रोच आंदोलनातील पोरापोरींमध्ये होती वा असणार. त्यांच्या शिव्या, वागणं कदाचित वा बहुदा कोणालाच आवडणार नाही, पण त्यांचे प्रश्न खरे आहेत. पेपरफुटीमुळे मुलं किती अस्वस्थ असतील, त्यांचं भवितव्य यामुळे संपू शकतं वा त्यात अडथळे येतात, याचा विचार फारसा होताना दिसला नाही.
ते सारं आपल्याला कळणंही शक्य नाही, कारण आपण त्यांच्या पद्धतीने विचारच करू शकत नाही. जनरेशन गॅपचा तो परिणाम आहे. जेन झीमध्ये मद्यपान, धूम्रपान यांचं प्रमाण खूपच कमी आहे, हेही आपल्या लक्षात आलेलं नाही. अर्थात आपल्या पिढ्या तरी नेमक्या कोणत्या आणि त्यांची नावं तर काय आहेत, हे तरी आपल्या सर्वांना कुठे माहीत आहे? तेही समजून घ्यायला हवं. सन 1981 ते 1996 या काळात जन्मलेले 30 ते 45 वर्षांचे सारे आहेत जेन वाय. त्या पिढीला मिलेनिअल्सही म्हणतात, कारण त्यातील काही जण 2000 साली 18 वर्षांचे म्हणजे सज्ञान झाले होते. गेल्या शतकाची बर्यापैकी माहिती असलेली ती पिढी. त्याहीआधी 1965 ते 1980 मध्ये जन्मलेले 46 ते 60 वयाचे सारे जण ‘जेन एक्स’ नावाने ओळखले जातात आणि 1946 ते 1964 मध्ये जन्मलेले 62 ते 80 वयाचे म्हणजे बूमर किंवा बेबी बूमर!
ही स्वातंत्र्याच्या दरम्यान वा त्यानंतरच्या 17-18 वर्षांत जन्मलेले. किती मोठी जनरेशन गॅप आहे पाहा. एका चित्रपटात दीपिका पदुकोन म्हणते, ‘एक चुटकी सिंदूर की किमत तुम क्या जानो रमेश बाबू’. खरेदीसाठी बाहेर न पडणार्या आपल्या वा आधीच्या पिढीतील अनेकांना आजचे बाजारभावही माहीत नसतात. मग जनरेशन झीचे प्रश्न कसे समजणार? तुम्ही त्यांचे आई-बाप असा की देशाचे पंतप्रधान! नव्या पिढीच्या नावाने किती बोटं मोडायची? जनरेशन बिटा अद्याप जन्माला यायची आहे. जेन अल्फा अजून लहान आहे. हे जेव्हा मोठे होतील, तेव्हा जेन झी व जेन वाय यांचीही अवस्था आजच्या आपल्यासारखी होईल.
| # | Наименование новости | Тональность | Информативность | Дата публикации |
|---|---|---|---|---|
| 1 | Gen Z gets into pest control: NEET protests cut across identity lines, and bypass mainstream media’s ‘manufactured consent’ | 0 | 8.37 | 23-07-2026 |
| 2 | БЖ. Ода центральному району Актрисе и режиссёру Александре Сенкевич с ... | 0 | 5.87 | 24-07-2026 |
| 3 | Так да не так Из пистолета он, видите ли, игрушечного ... | 0 | 6.44 | 01-08-2026 |
| 4 | Говорят, что «поздний» Жванецкий, мудрый еврей, всю свою жизнь критиковавший ... | 0 | 4.63 | 05-08-2026 |
| 5 | India's Gen Z 'Cockroach People's Party' started as satire but is serious about change | 0 | 9.48 | 20-07-2026 |
| 6 | Leftists Excited to Begin Cannibalizing the Elderly | 0 | 14.55 | 23-04-2026 |
| 7 | Друзья почитайте !!!❤️ И вот что писал Жванецкий, уже старый ... | 6 | 7 | 10-07-2026 |
| 8 | Вот что писал Жванецкий, уже старый и мудрый еврей, всю ... | 3 | 7 | 11-07-2026 |
| 9 | Вот что писал Жванецкий, уже старый и мудрый еврей, всю ... | 3 | 7 | 11-07-2026 |
| 10 | "Жерине жараша бөлөбүз". Дыйканга дизел майы керек | 0 | 8.21 | 29-07-2026 |